जळगाव : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे चार अल्पवयीन भावंडांची हत्या करण्यात आली आहे. यामध्ये 2 मुली आणि 2 मुलांचा समावेश आहे. शुक्रवारी सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला. रावेरच्या बोरखेडा रोडवरील शेतात चौघांचे मृतदेह आढळून आले. सविता (वय 14), राहुल (वय 11), अनिल (वय 8) व नाणी (वय 5) या भावंडांची नावे आहेत. कुर्‍हाडीने वार करून त्यांची हत्या करण्यात आली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा