कुमार नाईकवाडी

तुळजापुर :महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि साडेतीन शक्ती पीठांपैकी एक पीठ असलेल्या श्री तुळजा भवानी मातेच्या दरबारात शनिवार रोजी संबळाच्या निनादात घटस्थापना झाली.यंदा भक्तांशिवाय शारदीय नवरात्र महोत्सावास प्रारंभ झाला. इतिहासात प्रथमच शारदीय नवरात्र महोत्सव भक्तांशिवाय साजरा करावा लागत आहे. तत्पूर्वी शारदीय नवरात्र महोत्सवापुर्वी नऊ दिवस श्री तुळजा भवानी मातेची मंचकी निद्रा असलेली मुख्य चलमुर्ती शेजघरातील पलंगावरुन दि.१७ शनिवार रोजी पहाटे ३ वाजता सिंहासनावर विराजमान झाली त्यानंतर श्री देवीस प्रथम दुग्धा अभिषेक घालून वस्त्रे अलंकार पूजा करण्यात आली.

या वेळी श्री तुळजा भवानी मातेचे मुख्य महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा श्री तुळजा भवानी मातेचे मुख्य भोपे पाळीचे पुजारी श्री तुळजा भवानी मंदीर संस्थानचे विश्वस्थ तहसीलदार सौदागर तांदळे धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले आदीसह पाळीकर पुजारी, सेवेदारी मंदीर कर्मचारी उपस्थित होते.

सकाळी सहा वाजता परत एकदा देवीस पंचामृत अभिषेक करून वस्त्रे अलंकार चढवून शारदीय नवरात्र महोत्सवाची पाहिल्या दिवसाची नित्योपचार पुजा करुन धुपारती करण्यात आली.यानंतर श्री गोमुख तिर्थ कुंडाजवळ तीन घट कलशाची मा.जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर व त्यांच्या पत्नी प्रियंका दिवेगावकर यांच्या हस्ते तीन घट कलशाची विधिवत यथासांग पुजा करुन पारंपरिक वाद्याच्या गजरात आई राजा उदो गजरात श्री तुळजा भवानी मातेच्या सिंह गाभाऱ्यात नेऊन घटस्थापना करण्यात आली.

या घटस्थापनेस प्रथम विड्याच्या पानांची शारदीय नवरात्र महोत्सवाची पाहिल्या माळेची माळ घालून घटस्थापेनेस प्रारंभ झाला.या नंतर श्री तुळजा भवानी मातेच्या दरबारातील उपदेवता असलेल्या येमाई देवी, खंडोबा मंदीरात टोळ भैरव मंदीरात आदीमाया आदी शक्ती मंदीरात विधीवत पुजा करुन घटस्थापना करण्यात आली.

तुळजापूर : भक्तांशिवाय शारदीय नवरात्र महोत्सावास प्रारंभ
- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा