नवी दिल्ली : विविध मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर सातत्याने टीका करणारे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ग्लोबल इंडेक्स हंगर-२०२० मधील भारताच्या स्थितीवरून केंद्र सरकावर निशाणा साधला आहे. ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भूकबळींच्या प्रकरणी जगातील १०७ देशांपैकी भारत ९४ व्या स्थानी आहे. केंद्र सरकारने आपल्या काही खास मित्रांचे खिसे भरल्याने ही स्थिती उद्भवल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.

राहुल गांधी शनिवारी आपल्या ट्विटर हँडलवर भारताची स्थिती दाखवणारे एक ट्विट केले. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात,’भारतातील गरीब उपाशी आहे, कारण सरकार फक्त काही खास मित्रांचे खिसे भरण्याच्या कामी लागले आहे.’

भूकबळी आणि कुपोषणाचा विचार करता भारत आपल्याहून छोटे असलेले शेजारी देश नेपाळ, बांगलादेश आणि पाकिस्तानपेक्षाही मागासलेला आहे. १०७ देशांच्या या यादीत भारत ९४ व्या स्थानी आहे. या अहवालानुसार, भारतीतील भूकबळीची स्थिती गंभीर आहे.

ग्लोबल इंडेक्स हंगरमध्ये वर्ष २०१४ मध्ये भारत ५५ व्या स्थानी होता. तर २०१९ मध्ये भारत १०२ ऱ्या स्थानी आला होता. तथापि, यादीत नोंद करण्यात आलेल्या देशांची नावे दरवर्षी वाढताना दिसत आहेत. सन २०१४ मध्ये भारत ७६ देशांच्या यादीत ५५ व्या पायरीवर होता. २०१७ मध्ये तयार झालेल्या ११९ देशांच्या यादीत भारत १०० व्या, तर सन २०१८ च्या ११९ देशांच्या यादीत भारत १०३ व्या स्थानी होता.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा