पुणे : पुण्यातील पूरस्थितीस महापालिका जबाबदार असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या कारभारावर टीकास्त्र सोडले. बांधकाम व्यावसायिकांनी नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह अडवल्यामुळे परिस्थिती गंभीर होत आहे. पावसाळ्यात करावयाच्या उपाययोजना महापालिकेने योग्य पद्धतीने केल्या नसल्यामुळे शहरात पूरस्थिती निर्माण होत असल्याची टीकाही त्यांनी केली.

शहरातील कोरोनाची स्थिती आणि विविध विकास कामांच्या आढाव्यासाठी विधान भवन येथे शुक्रवारी बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी पवार बोलत होते.
पवार म्हणाले, शहरात बांधकाम व्यावसायिकांनी पाण्याचे नैसर्गिक प्रवाह वळवले आहेत. तर काही मार्ग कायमचे बंद केले. पावसाच्या पाण्याला वाहून जाण्यासाठी मार्ग मिळत नसल्याने दुर्घटना घडत आहेत. पावसाच्या पार्श्वभूमीवर काही कामे आधीच करायला हवी होती. या सर्व गोष्टींचा आढावा घेणार आहे.

गेल्या वर्षी आंबिल ओढ्याला आलेल्या पुरानंतर महापालिका प्रशासनाने अनेक कामे हाती घेतली होती. नाल्यावर सीमाभिंत बांधण्याचेही ठरले. मात्र, अद्याप कामे मार्गी लागलेली नाहीत. ज्या भागात पाणी शिरले होते त्याठिकाणी पुन्हा पाणी जावू नये, यासाठी उपाययोजना करणे आवश्यक होते. मात्र, त्यादृष्टीने ना कामे झाली ना आवश्क पावले उचलली गेली. याही वर्षी याच भागात पाणी शिरल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागला.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा