पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी कोरोनाचे २३३ नवे रुग्ण आढळले, तर १२ जणांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी ४७२ जणांना घरी सोडण्यात आले आहे.शहरात 85 हजार 114 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 2 हजार 209 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात शुक्रवारअखेर 80 हजार 752 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मनपा हद्दीत 1 हजार 464 तर मनपा हद्दीबाहेरील 596 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शुक्रवारी 2 हजार 203 संशयित रूग्णांना महापालिकेच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. 1 हजार 977 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले. 765 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. शहरातील 14 हजार 535 घरांना भेटी देऊन 45 हजार 126 जणांचे सर्व्हेक्षण करण्यात आले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा