रेल्वे मंडळ अंतिम निर्णय घेणार

मुंबई,(प्रतिनिधी) :‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत एकेक निर्बंध शिथिल करत असलेल्या राज्य सरकारने गुरूवारी नवरात्रीच्या मुहूर्तावर नोकरदार महिलांना खूषखबर दिली आहे. आजपासून (शनिवार) सरसकट सर्व महिलांना लोकल ट्रेनच्या प्रवासाची मुभा राज्य सरकारने दिली आहे. महिलांना प्रवासाची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती करणारे पत्र राज्य सरकारने मध्य व पश्चिम रेल्वे तसेच रेल्वे मंडळाला पाठविले आहे. मात्र, रेल्वे मंडळाच्या निर्णयानंतरच महिलांना प्रवासाची परवानगी मिळणार आहे.

वर्षाचे तीनशे पासष्ठ दिवस अहोरात्र धावणारी मुंबई व मुंबईची रक्तवाहिनी म्हणून ओळखली जाणारी उपनगरीय रेल्वेसेवा कोरोनाच्या संकटामुळे विस्कळीत झाली होती. जूनपासून उपनगरीय रेल्वेसेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील शासकीय कर्मचार्‍यांसाठी सुरू करण्यात आली. मात्र, सर्वसामान्य प्रवाशांना यात प्रवासाची परवानगी नसल्याने त्यांचे हाल होतात. विशेषतः कामानिमित्त बाहेर पडणार्‍या महिलांची खूपच परवड होते. कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नसल्याने उपनगरीय रेल्वेसेवा सुरू केल्यास संसर्ग वाढण्याची भीती आहे. मात्र, एक पाऊल पुढे टाकत राज्य सरकारने सर्व महिलांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 व सायंकाळी 7 ते लोकलसेवा सुरू असेपर्यंत महिलांना लोकलमधून प्रवास करता येणार आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा