अबूधाबी : मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स हे दोन संघ हंगामात दुसर्‍यांदा आमने सामने आले. पहिल्यांदा फलंदाजी करताना कोलकात्याने 5 बाद 148 धावांचे आव्हान मुंबईला दिले. या सामन्यापासून कोलकात्याचे नेतृत्व इयॉन मॉर्गनकडे सोपवण्यात आले आहे. कोलकाताच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत, तर मुंबईच्या संघात एक बदल करण्यात आला आहे. 23 सप्टेंबरला या दोघांमध्ये पहिला सामना रंगला होता. त्या सामन्यात मुंबईने 49 धावांनी विजय मिळवला होता.त्यामुळे त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी कोलकाताचा संघ मैदानात उतरला आहे. तर दुसरीकडे विजयी लय कायम राखण्यासाठी मुंबईचा संघ सज्ज आहे.

मुंबईकर सूर्यकुमारने टिपला जबरदस्त झेल

मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स हे दोन संघ हंगामात दुसर्‍यांदा आमने सामने आले. कोलकाताच्या नेतृत्व बदलाला नशिबाची साथ मिळाली. सामन्याआधी दिनेश कार्तिकने कर्णधारपद सोडले त्यामुळे त्याच्याजागी कोलकात्याचे नेतृत्व इयॉन मॉर्गनकडे सोपवण्यात आले. नाणेफेक जिंकून कोलकाताच्या संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजी आलेला राहुल त्रिपाठी आणि शुबमन गिल दोघेही झटपट धावा घेण्याच्या उद्देशाने खेळत होते.

ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर हल्लाबोल करायचा असे डोक्यात ठेवून राहुल त्रिपाठीने फटकेबाजी प्रयत्न केला. पहिला फटका उत्तम प्रकारे सीमारेषेपार गेला, पण पुढच्या चेंडू तो बाद झाला. बोल्टने टाकलेला चेंडू राहुल त्रिपाठीने पॉईंटच्या दिशेने मारला. चेंडू वेगाने हवेत जात होत. तोच सूर्यकुमार यादवने अप्रतिम झेप घेत त्याला झेलबाद केले. चेंडू वेगाने जात असल्यामुळे झेल टिपला जाईल असं बोल्टलाही वाटलं नव्हतं पण सूर्यकुमारने झेल घेतला हे पाहिल्यावर गोलंदाज बोल्टही अवाक झाला.

कोलकाताच्या संघात दोन बदल करण्यात आले. तर मुंबईच्या संघात एक बदल करण्यात आला. कोलकाताने फलंदाज टॉम बॅन्टन आणि वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटी यांना संघातून बाहेर केलं.

त्यांच्या जागी संघात ख्रिस ग्रीन आणि शिवम मावीला यांना संधी दिली. मुंबईच्या संघात फारसे बदल केले जात नसले तरी आजच्या सामन्यात वेगवान गोलंदाज जेन्स पॅटिन्सनला संघाबाहेर ठेवण्यात आले. वेगवान गोलंदाजांवर ताण येऊ नये म्हणून त्याला संघाबाहेर करण्यात आले. त्याच्या जागी नॅथन कुल्टर-नाईलला संधी देण्यात आली.

इयान मॉर्गन कोलकात्याच्या संघाचा नवीन कर्णधार

आयपीएलच्या तेराव्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सच्या संघात महत्वाचा बदल झालेला आहे. कर्णधार दिनेश कार्तिकने आपल्या फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रीत करता यावे यासाठी कर्णधारपदाची जबाबदारीतून स्वतःला मोकळे करण्याची विनंती संघ प्रशासनाला केली होती. आयपीएलच्या प्रशासनाने ही विनंती मान्य करत संघाचे नेतृत्व इंग्लंडचा विश्वचषक विजेता कर्णधार ओएन मॉर्गनकडे सोपवले आहे. कोलकात्याने याबद्दल परिपत्रक काढत माहिती दिली आहे.

दिनेश कार्तिकसारख्या खेळाडूने आतापर्यंत कोलकात्याचे नेतृत्व केले. यासाठी आम्ही त्याचे आभारी आहोत. आपला खेळ हवा तसा होत नसल्यामुळे कर्णधारपदाची जबाबदारी दुसर्‍याकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यासाठी मोठे मन लागते. दिनेशने घेतलेल्या निर्णयामुळे आम्हाला थोडा धक्का बसला, परंतू त्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. परंतू संघात मॉर्गनसारखा अनुभवी खेळाडू असल्यामुळे यापुढे तो कोलकात्याचे नेतृत्व करेल. दिनेश आणि मॉर्गन यांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे यापुढील सामन्यांमध्येही हे दोन्ही खेळाडू अशीच कामगिरी करत राहतील असा आम्हाला विश्वास आहे. कोलकात्याचे सीईओ वेंकी मैसूर यांनी ही माहिती दिली. आयपीएलच्या तेराव्या हंगामात कोलकात्याचा संघ सध्या 8 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा