दुबई : आयपीएलमध्ये समलोचन समितीत कार्यरत असणारा इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन याने पॅनेलमधून तत्काळ प्रभावाने माघार घेतली. पीटरसनने स्पर्धा सुरू होण्याआधी हंगामाच्या मध्यात मायदेशी परतणार असल्याचे सांगितले होते.त्यानुसार पीटरसनने ट्विट करत याबाबतची माहिती दिली. कौटुंबिक कारणामुळे त्याने या कार्यातून माघार घेतली. मी आयपीएलच्या समालोचन समितीतून माघार घेत आहे. माझ्या कुटुंबासाठी आणि मुलांसाठी मी हा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत हे वर्ष खूपच विचित्र पार पडले. सध्या माझी मुले शाळा चालू नसल्याने घरीच आहेत. मला त्यांच्यासोबत घरी छान वेळ घालवायचा आहे.

रोज पूर्ण दिवसभर मला त्यांच्यासोबत मजा मस्ती करायची आहे, असे ट्विट पीटरसनने केले आहे.केविन पीटरसन हा आयपीएलच्या कॉमेंट्री पॅनेलमधील एक लोकप्रिय चेहरा आहे. न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू डॅनी मॉरिसन याच्यासोबत पीटरसनदेखील समालोचन समितीतील एक विशेष प्रतिनिधी आहे. परंतु कौटुंबिक कारणामुळे त्याने आयपीएलमधून माघार घेतली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा