नवी दिल्ली : राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोविड-19 चा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ते गृह विलगीकरणात आहेत. स्वतः आझाद यांनी समाज माध्यमाद्वारे ही माहिती दिली. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. याआधी, काँग्रेस नेते अहमद पटेल, मोतीलाल व्होरा आणि अभिषेक सिंघवी यांना कोरोनाची लागण झाली. सिंघवी यांनी कोरोनावर मात केली आहे. तर, अन्य दोघांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा