नवी दिल्ली : देशात मागच्या 24 तासांत 63 हजार 371 नव्या रुग्णांची भर पडली. तर, 70 हजार 338 रुग्णांनी कोरोनावर मात केली. गेल्या 24 तासांत 895 जणांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्या 73 लाख 70 हजार 468 वर पोहोचली. तर, बळींची संख्या 1 लाख 12 हजार 161 इतकी झाली. देशात सध्या 8 लाख 4 हजार 528 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 64 लाख 53 हजार 779 रुग्णांनी कोरोनावर मात केली. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87.56 टक्के इतके असून मृत्युदर 1.52 टक्के इतका आहे. मागच्या 24 तासांत 10 लाख 28 हजार 622 जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत 9 कोटी 22 लाख 54 हजार 927 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी 6.16 टक्के रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. सर्वाधिक बळीदेखील महाराष्ट्रात गेेले आहेत. काही दिवसांपासून केरळ, कर्नाटक, राजस्तान, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमध्ये रुग्ण वाढत असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या राज्यांत विशेष पथक पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा