८७ हजार ४१६ हेक्टर शेतीचे नुकसान

पुणे : अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये 14 आणि 15 ऑक्टोबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसांत पाचही जिल्ह्यांमध्ये मिळून 29 जणांचा मृत्यू झाला असून 8 जण बेपत्ता आहे, तर 40 हजार नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. तब्बल 87 हजार 416 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. तर दोन हजारपेक्षा अधिक घरांची पडझड झाली असून 513 जनावरे मृत्युमुखी पडली.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा पश्चिम महाराष्ट्राला मोठा फटका बसला आहे. याबाबत पुणे विभागीय आयुक्तालयाने पाचही जिल्ह्यातील नुकसानीची माहिती शुक्रवारी दिली. त्यानुसार विभागात सरासरी 81.9 एवढे पर्जन्यमान झाले. त्यामध्ये पुणे जिल्ह्यात पुणे शहर, हवेली, बारामती, इंदापूर, दौंड आणि बारामती, सांगली जिल्ह्यात मिरज, वाळवा, तासगाव आणि पलूस, सोलापूर जिल्ह्यात उत्तर सोलापूर, मोहोळ, माढा, करमाळा आणि माळशिरस या ठिकाणी 100 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. पुणे जिल्ह्यात 925 कुटुंबातील तीन हजार नागरिक, साताजयातील 56 कुटुंबातील 213 नागरिक, सांगलीत 215 कुटुंबातील 1079 आणि सोलापुरात 4865 कुटुंबातील 17 हजार अशा एकू ण 6061 कुटुंबातील 21 हजार 292 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्यातील 11, सांगलीतील 24 आणि सोलापूरातील 487 अशी लहान मोठी मिळून एकूण 513 जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. तसेच पुण्यातील 13, सातार्‍यातील 267, सांगलीतील 323 आणि सोलापूरातील 1716 अशा एकूण 2319 घरांची पडझड झाली आहे. याबरोबरच पुण्यातील 18 हजार 746 हेक्टर, सातार्‍यातील 1420 हे., सांगलीत 2400 हे. आणि सोलापूरात 34 हजार 788 अशा एकूण 57 हजार 354 हेक्टरवरील ऊस, सोयाबीन, भाजीपाला, डाळिंब, भात, कापूस, तूर अशा शेतपिकांचे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा