पुणे : शहर परिसरात झालेल्या जोरदार पावसाचा फटका व्होडाफोन-आयडियाचे नेटवर्क वापरणार्‍या ग्राहकांना बसला. दिवसभर मोबाईल नेटवर्क न मिळाल्याने अनेक जणांना मनस्ताप सहन करावा लागला. तसेच, हिराबाग चौकात असणार्‍या व्होडाफोन कार्यालयाबाहेर नागरिकांनी विचारणा करण्यासाठी मोठी गर्दी होती. यावेळी पोलिसांकडून गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागले.

पुण्यातील केंद्रात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे राज्याच्या निम्म्याहून जास्त सर्कलमध्ये ग्राहकांना व्होडाफोनचे मोबाईल नेटवर्क नसल्याने त्रास सहन करावा लागला. कंपनीच्या या ढिसाळ कारभारावर राग ग्राहकांनी माध्यमवार टीका करुन काढला. तर शहरातील अनेक ग्राहकांनी थेट व्होडाफोन कार्यालयात जाऊन याबाबत विचारणा केली. या सेंटरमध्ये विचारणेसाठी येणारा ग्राहकांचा ओघ पाहता, कंपनीतर्फे
सुरक्षेसाठी अनेक सर्व्हिस सेंटर्समध्ये पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता.

दरम्यान, याबाबत व्होडाफोन कंपनीने अधिकृत परिपत्रक जाहीर करत, वोडाफोनच्या नेटवर्कमधील बिघाड झाल्याचे मान्य केले. तसेच पावसामुळे व्होडाफोन यंत्रणेत निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ही स्थिती उदभवली असून, त्याबाबत काम सुरू आहे. लवकरच ही सेवा सुरळीत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा