हैदराबाद : गेल्या दोन-तीन दिवसांपासून तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाने आतापर्यंत 30 जणांचे बळी घेतले आहे. कर्नाटकातही धुव्वाधार पाऊस पडत आहे. तेलंगणातील 19 बळी एकट्या हैदराबादमध्ये गेले आहेत. तर, चौघे बेपत्ता आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि आंध्र प्रदेशातील मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. राज्यातील परिस्थिती जाणून घेतानाच आवश्यक मदतीचे आश्वासन दिले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा