पुणे : पुण्यात कोरोनामुक्त होणार्‍यांची वाढती संख्या दिलासादायक आहे. गुरुवारी 825 जण कोरोनामुक्त झाले. तर, 549 नव्या रुग्णांची भर पडली आहे. मागील चोवीस तासात एकूण 24 जणांचा मृत्यू झाला. या मृतांपैकी 3 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

काल दिवसभरात स्वॅब व अँटिजेन चाचणीसाठी 4 हजार 220 संशयितांचे नमुने घेण्यात आले. यातील 549 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. बाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 1 लाख 56 हजार 144 वर पोहोचली आहे. शहर परिसरातील विविध रुग्णालयांत 10 हजार 236 रुग्ण उपचार घेत आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 835 रुग्ण अत्यवस्थ आहेत, तर 450 रुग्ण व्हेंटिलेटरवर असून, 385 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा