पुणे : नाल्यांवर ज्या भागात अतिक्रमण झाले आहे, नाले काटकोनात वळवण्यात आले आहेत, अशा ठिकाणी वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे भविष्यात या ठिकाणची अतिक्रमणे काढणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त शंतनु गोयल यांनी सांगितले.

शहरात बुधवारी 90 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मागिलवर्षी आंबिलओढ्याला आलेल्या पुराच्या वेळी 79 मिलिमीटर नोंद झाली होती. शहरामध्ये महापालिका प्रशासनाने आपली पथके सज्ज ठेवल्यामुळे हानी झाली नाही. शहरात विविध भागात 45 ठिकाणी पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने आंबेगाव, अरणेश्वर, आळंदी रस्ता, दत्तवाडीमधील काही भाग, चंदननगर, कोथरूड या भागात पाणी शिरले होते. महापालिका प्रशासनाकडून पाणी काढण्यासाठी तत्काळ पथके पाठवण्यात आली होती. 10 ठिकाणी भिंत पडल्याच्या घटना घडल्या असल्याचे गोयल यांनी सांगितले. मागिलवर्षी 25 सप्टेंबरला आंबिलओढ्याला आलेल्या पुरानंतर महापालिका प्रशासनाने मोठी कामे केली आहे. मागिलवर्षी पेक्षा यावेळी अधिक पाऊस झाला आहे. तुलनेने यावर्षी कमी नुकसान झाले आहे. महापालिका प्रशासनाने आंबिलओढ्याची साफसफाई ज्या ठिकाणी प्रवाहाला अडचणी येत होत्या, असे मार्गी खुले केले आहेत. त्याचबरोबर पावसाळी पाहणी आणि मलवाहिन्यांचे साफ करण्याचे काम मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे पाण्याचा निचरा लवकर होवू शकला. आंबिल ओढ्यावर सीमाभिंत बांधण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. याठिकाणी 60 ते 70 टक्के जागा सध्या महापालिकेच्या ताब्यात आहे.

शहरातील ओढ्यावरील अतिक्रमणे तपासणार

शहरात अनेक ठिकाणी ओढे वळवण्यात आल्यामुळे काही रहिवासी भागात पाणी शिरत आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी ओढे वळवण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी असे प्रकार झाले आहेत, याची माहिती घेवून कारवाई करण्यात येणार असल्याचे सूतोवाच अतिरिक्त आयुक्त गोयल यांनी केले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा