नवी दिल्ली : हिवाळ्यात कोरोनाचा कहर वाढू शकतो. त्यादृष्टीने केंद्र सरकार आणखी काही पावले उचलत आहे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी सरकारने एक लाख मेट्रिक टन ऑक्सिजन परदेशातून खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सरकारने एक निविदाही काढली आहे. कॅबिनेट सचिवांच्या बैठकीत यावर चर्चा झाली. त्यानंतर, हा निर्णय घण्यात आला. ऑक्सिजनचा हा साठा उपलब्ध होण्यास दीड महिन्याचा कालावधी लागू शकतो. येत्या काळात अनेक सण आहेत. शिवाय, हिवाळाही येत आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत आणखी भर पडू शकते, अशी शक्यता वर्तविली जात आहे. देशात दररोज सात हजार मेट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन होते. त्यापैकी 3094 ऑक्सिजन कोरोना आणि अन्य रुग्णांसाठी लागत आहे. लॉकडाउनआधी देशात सहा हजार मेट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन केले जात होते. त्यापैकी एक हजार मेट्रिक टन ऑक्सिजन कोरोना रुग्णांसाठी लागत होता. अनलॉकनंतर ऑक्सिजनची गरज तीन पटीने वाढली. देशात सध्या 3.97 टक्के कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा