नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांची संख्या 73 लाख 7 हजार 98 वर पोहोचली आहे. त्यापैकी 63 लाख 83 हजार 441 रुग्णांनी कोरोनावर मात केली. सध्या 8 लाख 12 हजार 390 रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 1 लाख 11 हजार 266 जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले. मागच्या 24 तासांत 67 हजार 708 रुग्णांची भर पडली असून 680 जणांचा मृत्यू झाला. तर, 81 हजार 541 रुग्णांनी कोरोनावर मात केली. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87.35 टक्के इतके असून मृत्युदर 1.52 टक्के इतका आहे. सध्या 11.11 टक्के रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत 11 लाख 36 हजार 183 जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत 9 कोटी 12 लाख 36 हजार 305 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. देशात सर्वाधिक रुग्ण आणि बळी महाराष्ट्रात गेले आहेत. राज्यातील कोरोना रुग्णसंख्या 15 लाख 54 हजार 389 वर पोहोचली. तर, 40 हजार 859 जणांना प्राण गमवावे लागले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा