निवडणूक आयोग निधीसाठी पाठवणार केंद्राकडे प्रस्ताव

नवी दिल्ली : कोरोनामुळे बिहार निवडणूक प्रक्रियेवरील खर्च दुप्पटीने वाढणार आहे. गेल्या निवडणुकीसाठी 250 कोटी खर्च झाले होते. यंदा 625 कोटी लागणार आहेत. यासंदर्भात निवडणूक आयोग केंद्राकडे प्रस्ताव पाठविणार आहे. त्याद्वारे, अंदाजपत्रकातील निवडणूकविषयक खर्चाच्या तरतुदीत वाढ करण्याची मागणी करण्यात येणार आहे. दुसरीकडे, उमेदवार अथवा पक्षांकडून प्रचारावर होणारा खर्चदेखील वाढण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मते, बिहार निवडणुकीनंतर केंद्र सरकारकडे वाढीव निधीसंदर्भातील प्रस्ताव पाठविला जाईल. पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये, तर त्यानंतर उत्तर प्रदेशात निवडणुका पार पडणार आहेत. 2015 मध्ये बिहार निवडणुकीसाठी 250 कोटींचा खर्च आला होता. 2019 मधील लोकसभा निवडणुकीत 5 हजार कोटींचा खर्च झाला होता. 2014 मधील निवडणुकीपेक्षा हा खर्च दुप्पट होता. यंदा कोरोनामुळे अनेक गोष्टींवर मोठा खर्च होणार आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा