हाथरस प्रकरण

लखनौ : हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात सोमवारी सुनावणी पार पडली. यावेळी पीडित कुटुंबाने आपली बाजू मांडली. न्यायालयाने पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली. आता पुढील सुनावणी 2 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

पीडितेच्या कुटूंबानेही न्यायालयात सांगितले की, त्यांच्या परवानगीविना अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबातील सदस्यांना आणखी चौकशीत अडकविण्याची भीती होती आणि त्यांनी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. पुढील सुनावणीत पीडितेच्या कुटूंबाच्या आरोपांवर चर्चा होईल.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा