पुणे : पुणे-मुंबई प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे-मुंबई डेक्कन क्विन, मुंबई-पुणे इंद्रायणी एक्सप्रेस आणि मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस या रेल्वे गाड्या उद्या (शुक्रवार) पासून सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेसचे आरक्षण तिकीट बुधवारपासून सुरू झाले आहे. तर पुणे-मुंबइ; डेक्कन क्विन आणि मुंबई-पुणे इंद्रायणी एक्सप्रेसच्या आरक्षण तिकीटाला आज (गुरूवारी) सुरूवात होणार आहे. या गाड्यांना नवीन क्रमांक देण्यात आला आहे. मात्र या सर्व गाड्या जुन्याच वेळापत्रकानुसार धावणार आहेत. लॉकडाऊनपूर्वी इंद्रायणी एक्सप्रेस मुंबईहून पुण्यात आल्यानंतर ही गाडी पुणे-सोलापूर इंटरसिटी म्हणून धावत होती. मात्र आता ही गाडी पुणे-सोलापूर इंटरसिटी म्हणून धावणार नसल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सुमारे सात महिन्यांपूर्वी या गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे रेल्वेची पुणे-मुंबई प्रवासी वाहतूक बंद होती. मात्र आता पुणे-मुंबई दरम्यान दोन गाड्या धावणार असल्याने चाकरमान्यांची प्रवासाची गैरसोय दूर होणार आहे. या गाड्यांनी प्रवास करणार्‍या प्रवाशांनी आरक्षण करूनच प्रवास करावा. असे आवाहन रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना केले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा