शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांची माहिती

मुंबई : कोरोनाच्या संकटात सावध पावले टाकत केंद्र सरकारने शाळा सुरू करण्यास राज्यांना परवानगी दिली आहे. त्यानुसार राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिवाळीनंतर शाळा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय सर्वस्वी राज्य सरकारांवर सोपवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर बच्चू कडू यांनी पहिल्यांदा नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. लॉकडाऊनमध्ये राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद होती. मात्र, आता टाळेबंदी शिथिल होत असल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता नोव्हेंबर महिन्यात नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याची तयारी राज्य सरकार करत आहे. सर्व नियम व अटींचे पालन करून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा