दिवसभरात १,९६४ नवे रुग्ण

पुणे : पुण्यात कोरोनावर मात करणार्‍यांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाला दिलासा मिळत आहे. मात्र एकीकडे मृत्यूंच्या व बाधितांच्या संख्येत रोज नव्याने भर पडत असल्याने चिंता कायम आहे. गुरुवारी दिवसभरात 2 हजार 219 जण कोरोनामुक्त झाले, असून त्यांना घरी सोडण्यात आले. तर, 1 हजार 964 नव्या रुग्णांची भर पडली आहे. मागील चोवीस तासांत 62 रुग्णांचा मृत्यू झाला. यापैकी 17 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

शहरात काल स्वॅब व अँटिजेन चाचणीसाठी 6 हजार 549 संशयितांचे नमुने घेण्यात आले. यातील 1 हजार 964 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. बाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 1 लाख 26 हजार 532 वर पोहोचली आहे. शहर परिसरातील विविध रुग्णालयांत 17 हजार 372 रुग्ण उपचार घेत आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 939 रुग्ण अत्यवस्थ आहेत, तर 479 रुग्ण व्हेंटिलेटरवर असून, 460 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. कोरोनामुळे मृत्यूू झालेल्यांची संख्या 2 हजार 963 वर पोहोचली आहे. आजपर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या 1 लाख 61 हजार 97 झाली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा