पुणे: ससून रुग्णालयातून शिवाजीनगर येथील जम्बो रुग्णालयात हालवण्यात आलेल्या 35 व्हेंटिलेटरपैकी 20 नादुरुस्त व्हेंटिलेटर पाठवण्यात आले होते. महापालिका प्रशासनाने हे व्हेंटिलेटर परत ससून रुग्णालयास पाठवण्यात आले असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली आहे.
एक महिन्यापुर्वी जम्बो हॉस्पीटलचे उदघाटन करण्यात आले होते. यावेळी महापालिकेला ससून रुग्णालयाकडून 35 व्हेंटिलेटर मशिन वाठवण्यात आल्या. यापैकी 20 मशिन बंद होत्या. तर 15 मशिन या महापालिकेने पिंपरी- चिंचवड येथील आण्णासाहेब मगर स्टेडियमवरील जम्बो रुग्णालयाला 15 व्हेटिलेटर देण्यात?आले आहेत.
ससून रुग्णालयाने महापालिकेला बंद पडलेले व्हेंटिलेटर कशासाठी दिले हा प्रश्न उपस्थित होते आहे. जम्बो रुग्णालय सुरु करण्याच्या वेळेस व्हेंटिलेटरची आवश्यकता होती. यावेळीच नेमके बंद पडलेले व्हेंटिलेटर ससूनकडुण देण्यात आले .

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा