कोरोनामुळे पंधरा दिवसांत मागणीत 20 ते 30 टक्क्यांनी वाढ
पुणे : कोरोना विषाणूंपासून सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येकांकडे रोग प्रतिकारशक्ती असणे आवश्यक आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढावी म्हणून अंडी खानार्‍यांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी दिवसेंदिव ग्राहकांकडून अंडीला मागणी वाढत आहे. मागणी वाढल्याने घाऊक आणि किरकोळ बाजारात भावही वाढले आहेत. किरकोळ बाजारात डझनाचा दर 70 ते 80 रूपये झाला आहे. तर एका नगाची किंमत 6.5 ते 7 रूपयावर गेली आहे. कोरोनामुळे मागणी कायम राहणार असल्याने आणखी दोन महिने ग्राहकांना अधिकच्या दराने अंडीची खरेदी करावी लागणार आहे.
शहरात कोरोना बाधितांची संख्या सुमारे 18 हजाराच्या जवळपास आहे. या रूग्णांना रोगप्रतिकार वाढविण्यासाठी अंडी खाण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. तसेच इतर नागरिकांनीही अंडी खाण्याचे प्रमाण वाढविले आहे. त्यातच ढगाळ आणि पावसाळी वातावरणामुळे खवैयांकडून अंडीला मागणी वाढली आहे. त्यातच फळभाज्या आणि पालेभाज्यांचे भाव तेजीत आहेत. त्यामुळे अंडी खाण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. या सर्व कारणांमुळे अंडीला प्रचंड मागणी होत आहे. परिणामी दरातही लक्षणीय वाढ झाली असल्याची माहिती व्यापारी व पुणे जिल्हा बायलर असोसिएशनचे संचालक रूपेश परदेशी यांनी दिली.
नेहमीच्या तुलनेत मागील पंधरा दिवसांत 20 ते 30 टक्क्यांनी अंडी खरेदी करणार्‍या ग्राहकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात गावरान अंडीच्या शेकड्याच्या दरात 100 ते 120 रूपयांनी वाढ झाली आहे. तेसच इग्लिश अंडीच्या दरात 100 रूपयांनी वाढ झाली आहे. पुणे शहरात पुणे जिल्हा आणि विभागातील कुकूटपालनातून अंडीची आवक होत आहे. तसेच हैदराबाद येथूनही मोठ्या प्रमाणात अंडीची आवक होत आहे. दर वर्षी आदिक महिन्यात अंडीला मागणी घटत असते. मात्र यंदा कोरोनामुळे मागणी घटण्याऐवजी वाढतच जाणार असल्याने अंडीचे दर आणखी काही महिने अधिक राहणार असल्याचा अंदाजही रूपेश परदेशी यांनी व्यक्त केला.
बाजारातील अंडीच्या दराची स्थिती
* गावरान अंडी शेकड्याचा दर – 800 रूपये
* इग्लिश अंडी शेकड्याचा दर – 570 रूपये
* किरकोळमधील डझनाचा दर- 70 ते 80 रूपये
* किरकोळमधील एका नगाचा दर – 6.5 ते 7 रूपये
* शहरातील रोजची मागणी – 15 ते 20 लाख अंडी
* शहरात होणारी रोजची आवक- 10 ते 15 लाख अंड

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा