पुणे : प्रसिद्ध अभिनेत्री ललिता देसाई ऊर्फ आशू यांचे दीर्घ आजाराने बुधवारी पुण्यातील खासगी रूग्णालयात निधन झाले. त्या 75 वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे पती आणि मुलगा असा परिवार आहे. आशू प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर आज (गुरूवारी) सकाळी 11 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
आशू यांचा जन्म 21 जानेवारी 1945 मध्ये झाला. लग्नाची बेडी, गुंतता ह्दय हे, नाथ हा माझा, अपराध मीच केला, तुझे आहे तुजपाशी, अभिलाषा आदी मराठी नाटकात त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच कब क्यु और कहा, अमर प्रेम, संतान, सीता और गीता, यादो की बारात आदी हिंदी चित्रपटातही आशू यांनी भूमिका केल्या आहेत. आशू यांनी दादा कोंडके याच्यासोबत काही भूमिका केल्या आहेत. तसेच आचार्य अत्रे यांच्या ‘ब्रम्हचारी’ या नाटकात किशोरीची भूमिका साकारली. ही भूमिका अत्यंत गाजली. ‘लग्नाची बेडी’ या नाटकांचे हजारो प्रयोग झाले. त्यातील रश्मीही भूमिका आशू यांनी साकारली होती. ही भूमिका लोकप्रिय आणि संस्मरणीय करण्यात नटवर्य बापूराव यांच्यासह स्नेहप्रभा प्रधान, हंसा वाडकर, पद्मा चव्हाण, अश्विनी भावे यांचेही मोठे योगदान आहे.
आशू यांची गाजलेली नाटके
ललिता देसाई ऊर्फ आशू यांनी अनेक मराठी नाटकांत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यातील लग्नाची बेडी, गुंतता ह्दय हे, नाथ हा माझा, अपराध मीच केला, तुझे आहे तुजपाशी, अभिलाषा आदी नाटकांतील त्यांच्या भूमिका आजही प्रेषकांच्या मनात कायम आहेत. अस्सल अभिनयामुळे आशू या कायमच रंगभूमीवर आघाडीवर होत्या.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा