पुणे : पुण्यात बाधितांची संख्येबरोबर मृत्यूंची संख्यादेखील कायम आहे. तर कोरोनावर मात करण्याची संख्यादेखील वाढत असल्याने एकीकडे दिलासा मिळत आहे.

मंगळवारी दिवसभरात 1 हजार 691 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1 हजार 563 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मागील चोवीस तासांत 53 रुग्णांचा मृत्यू झाला. यापैकी 13 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

पुण्यात अत्यवस्थ रूग्ण आणि मृत्यूंची संख्या कमी करणे हे प्रशासनासमोर आव्हान ठरत आहे. शहरात काल स्वॅब व अँटिजेन चाचणीसाठी 5 हजार 494 संशयितांचे नमुने घेण्यात आले. यातील 1 हजार 691 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. बाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 1 लाख 22 हजार 448 वर पोहोचली आहे. शहर परिसरातील विविध रुग्णालयांत 17 हजार 478 रुग्ण उपचार घेत आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 929 रुग्ण अत्यवस्थ आहेत, तर 473 रुग्ण व्हेंटिलेटरवर असून, 456 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. कोरोनामुळे मृत्यूू झालेल्यांची संख्या 2 हजार 875 वर पोहोचली आहे. आजपर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या 1 लाख 2 हजार 95 झाली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा