मुंबई : अभिनेत्री कंगना राणावतने मुंबई महापालिकेविरोधात दोन कोटी रुपयांचा दावा केला आहे. मुंबईतील पाली हिल इथल्या कार्यालयावर केलेल्या कारवाईनंतर कंगनाने बीएमसीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. 22 सप्टेंबर रोजी या प्रकरणावर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मुंबईची पाकव्याप्त काश्मीरसोबत तुलना केल्यानंतर सुरू झालेला वाद कंगनाच्या कार्यालयावरील कारवाईपर्यंत पोहोचला. कंगनाला वांद्रे येथील तिच्या कार्यालयात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी 8 सप्टेंबर रोजी मुंबई महानगरपालिका कायद्यातील कलम 354(अ) नुसार नोटीस बजावण्यात आली होती. त्यावर उत्तर देण्यासाठी कंगनाला 24 तासांची मुदत देण्यात आली होती. पण, तिच्याकडून कोणतेही उत्तर न आल्याने पालिकेकडून 9 सप्टेंबर रोजी सकाळी तिथे तोडकामाला सुरुवात करण्यात आली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा