नवी दिल्ली : काही व्यक्ती चित्रपट सृष्टीला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशा शब्दांत खासदार जया बच्चन यांनी भाजप खासदार रवी किशन यांच्यावर टीका केली. रवी किशन यांनी चित्रपटसृष्टीतील व्यक्तींकडून होणार्‍या अमलीपदार्थांच्या वापराचा मुद्दा उचलून धरताना याच्या चौकशीची मागणी केली होती. राज्यसभेत बोलताना जया बच्चन म्हणाल्या, जेव्हा देशात एखादी समस्या येते, त्यावेळी चित्रपटसृष्टीतील व्यक्ती सर्वात आधी मदतीसाठी पुढे येतात. चित्रपटसृष्टीची प्रतिमा डागाळताना पाहून अतिशय वेदना होत आहेत. ’लोग जिस थाली में खाते हैं उसीमें छेद कर रहे है’ असे सुनावत, काही लोकांमुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीला दोष देता येणार नाही, असे सांगितले.

कंगनाची आगपाखड

जया बच्चन यांच्या विधानावर कंगना राणावतकडून आगपाखड करण्यात आली. प्रतिक्रिया व्यक्त करताना तिची भाषाही घसरली. जर तुमचा मुलगा फासावर लटकला असता तरी तुम्ही हेच म्हटले असते का? तुमच्या मुलीला अमली पदार्थांच्या सेवनाची सवय लावली गेली असती, तर तुम्ही हिच प्रतिक्रिया दिली असती का? असे म्हणत तिने बच्चन कुटुंबीयांनाही या वादात ओढले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा