नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या 50 लाखाच्या घरात पोहोचली आहे. आठवडाभराच्या तुलनेत मंगळवारी रुग्णसंख्येत किंचित घट पाहायला मिळाली. मागच्या चोवीस तासांत कोरोनाचे 83 हजार 809 रुग्ण आढळून आले. तर,?1 हजार 54 जणांचा मृत्यू झाला. यासोबतच संक्रमितांची संख्या 49 लाख 30 हजार 236 तर, बळींची संख्या 80 हजार 776 वर पोहोचली. दिलासादायक म्हणजे, गेल्या 24 तासांत 79 हजार 292 रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर, 38 लाख 59 हजार 399 जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशात सध्या 9 लाख 90 हजार 61 रुग्ण उपचार घेत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 10 लाख 72 हजार 845 तर आठवड्याभरात तब्बल 76 लाख जणांची कोरोना चाचणी करण्यात आली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा