चंबळ नदीत मोठा अपघात

कोटा : राजस्तानच्या कोटा जिल्ह्यात बुधवारी सकाळी एक दुर्दैवी घटना घडली. चंबळ नदीत एक बोट उलटून मोठा अपघात घडलाय.या बोटीतून जवळपास ५० जण प्रवास करत होते. प्रवाशांमध्ये लहान मुलं आणि महिलांचाही समावेश होता.

ही घटना बुंदी जिल्ह्याच्या सीमेवर गोठडा कला गावानजिक चंबळ नदीत घडली.या बोटीत काही प्रवाशांशिवाय सामान आणि वाहनेही भरली गेली होती. बोटीतून प्रवासी बुंदी भागातील कमलेश्वर धामकडे जात होते. परंतु, नदीच्या मध्यभागात असतानाच बोट उलटली आणि हा अपघात घडला.

जवळपास २० जणांना वाचवण्यात यश आले. तर जवळपास सात मृतदेह पाण्यातून बाहेर काढले गेल्याची माहिती मिळतेय. मृतांमध्ये दोन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. उर्वरित प्रवाशांचा शोध अद्याप सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अपघातग्रस्त बोटीत वयस्कर व्यक्ती, महिला आणि मुलांचा समावेश जास्त होता. यातल्या बऱ्याच जणांना पोहताही येत नव्हते. ही घटना बुधवारी सकाळी नऊच्या दरम्यान घडली.

या घटनेवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही दु:ख व्यक्त केले. या ठिकाणी अवैध पद्धतीने बोटींचे संचालन सुरू असल्याच्या तक्रारी आता समोर येत आहेत. या ठिकाणी बोटींचे संचालन सुरू असले तरी कोणत्याही प्रकारच्या दुर्दैवी प्रसंगी बचावात्मक पद्धतीची कोणतीही सुविधा किंवा उपकरणे या ठिकाणी उपलब्ध नाही.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा