सिडनी : कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे 4 महिन्यांपेक्षा जास्त काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंद होते. यानंतर आयसीसीने सध्याची परिस्थिती लक्षात घेता नवीन नियम बनवून सामने खेळवण्यास परवानगी दिली. विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी खेळाडूंकरता जैव सुरक्षा कवच तयार करुन प्रेक्षकांना मैदानात प्रवेश नाकारण्यात आला. परंतू आता हळुहळु आंतरराष्ट्रीय क्रिकेट पूर्वपदावर येण्यासाठी सज्ज झाले आहे.

न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया या महिला संघाच्या मालिकेदरम्यान प्रेक्षकांना ठराविक प्रमाणात मैदानात प्रवेश दिला जाणार आहे. 26 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत दोन्ही संघांमध्ये एकदिवसाचे सामने आणि टी-20 मालिका खेळवली जाईल.

या मालिकेत ब्रिस्बेनच्या मैदानात ठराविक प्रमाणात प्रेक्षकांना परवानगी मिळणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या आरोग्य विभागाने यासाठी नियम जाहीर केले असून मैदान क्षमतेच्या 50 टक्के प्रेक्षकांना सामना पाहण्याची परवानगी मिळणार आहे.

या मालिकेसाठी मैदानाची सहा भागांत विभागणी करण्यात येणार असून ठराविक स्टँडमध्येच प्रेक्षकांना प्रवेश मिळेल. या मालिकेत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या महिला 3 टी-20 आणि 3 वन-डे सामने खेळतील. या निमीत्ताने आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटची सुरुवात होणार आहे. त्यामुळे या मालिकेत कोणता संघ बाजी मारतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा