अंतिम वर्ष परीक्षा

पुणे : अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी एमसीक्यू पद्धतीने एक तास कालावधीची 50 गुणांची परीक्षा असेल. त्यामध्ये 60 प्रश्नांपैकी 50 प्रश्नांची अचूक उत्तरे ग्राह्य धरण्यात येणार असून, प्रत्येकी 40 टक्के सोपे, 40 टक्के मध्यम स्वरूपाचे, तर 20 टक्के कठीण प्रश्न राहणार असल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी कोणताच पर्याय निवडलेला नाही, त्यांचा महाविद्यालयांच्या माध्यमातून पाठपुरावा केला जाईल. त्यांचे परीक्षेसाठीचे पर्याय भरून घेतले जातील. त्यामुळे किमान 40 ते 45 हजार विद्यार्थ्यांसाठी ऑफलाइन परीक्षा घ्यावी लागणार आहे.

अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या बॅकलॉग विषयांच्या परीक्षा 1 ते 9 ऑक्टोबर या कालावधीत होतील. तर, नियमित विषयांसाठीच्या परीक्षा 10 ते 30 ऑक्टोबरदरम्यान होणार आहेत. या दोन्ही परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. ऑनलाइन परीक्षेचा पर्याय निवडणार्‍या विद्यार्थ्यांना ओएमआर शीटचा वापर करून विद्यापीठ अनुदान मंडळ आणि राज्य सरकारच्या सूचनेप्रमाणे सुरक्षित अंतराचा वापर करून महाविद्यालयांमध्ये परीक्षा देता येणार आहे, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने देण्यात आली.

विद्यापीठाने परीक्षा कशी घ्यावी यासाठी उपलब्ध करून दिलेल्या अर्जांमध्ये 85 टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पर्याय निवडला आहे. नव्या सूचनांनुसार प्रात्यक्षिक परीक्षा येत्या 25 सप्टेंबरपर्यंत गुगल मीट, झूम, मायक्रोसॉफ्ट टीम्स, वेबेक्स, दूरध्वनी अशा कोणत्याही पद्धतीने ऑनलाइन माध्यमातून घ्यायची आहे. ही परीक्षा ठरलेल्या आराखड्यानुसार घेण्यात यावी; तसेच परीक्षेचे रेकॉर्डिंग जतन करून ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षा झाल्यानंतर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असणार्‍या लिंकद्वारे 5 ऑक्टोबरपर्यंत गुणांची नोंदणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

एकूण विद्यार्थी -2 लाख 59 हजार 402
अर्ज भरले -2 लाख 23 हजार 18
ऑनलाईन -1 लाख 85 हजार 177
ऑनलाईन परीक्षा
मोबाईलद्वारे -1 लाख 11 हजार 15
लॅपटॉपद्वारे -70 हजार 259
संगणकद्वारे -2 हजार 589
टॅब्लेट -1 हजार 314
ऑफलाइन -37 हजारांहून अधिक
पर्यायाशिवायचे विद्यार्थी – 18 हजार

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा