नवी दिल्ली : बँक गैरव्यवहारातील ३८ आरोपी देशाबाहेर पळून गेेल्याची माहिती समोर आली आहे. सीबीआय ज्या बँक गैरव्यवहारांचा तपास करत आहे; त्यातील हे आरोपी आहेत. अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांनी मंगळवारी संसदेत ही माहिती दिली.

अधिवेशनात प्रश्नोत्तरांचा तास नसल्याने मंत्र्यांकडून फक्त लेखी प्रश्नांना उत्तरे देण्यात येत आहेत. डीन कोरियाकोसे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला अनुराग ठाकुर यांनी उत्तर दिले.

सीबीआयने म्हटले आहे की, बँकांमधील आर्थिक अनियमिततेच्या प्रकरणातील 38 आरोपी 1 जानेवारी 2015 ते 31 डिसेंबर 2019 दरम्यान देशातून पळून गेले आहेत, असे अनुराग ठाकूर यांनी सांगितले. अंमलबजावणी संचालनालयाने 20 आरोपींच्या विरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जाहीर करण्यासाठी इंटरपोलकडे विनंती केली आहे. तर, 14 आरोपींना भारताकडे सोपविण्यासाठी विविध देशात अर्ज करण्यात आले आहेत. मात्र, त्यांनी किती रुपयांचा गैरव्यवहार केला याची कोणतीही माहिती दिलेली नाही. याआधी, 4 जानेवारी 2019 रोजी 27 जण देशाबाहेर पळून गेल्याचे संसदेत सांगितले होते. दीड वर्षात हा आकडा 38 वर पोहोचला आहे. तर, सनी कालरा आणि विनय मित्तल यांना देशात परत आणण्यात सरकारला यश आले आहे. सनी कालरा याने पंजाब नॅशनल बँकेत 10 कोटींचा तर मित्तल याने 40 कोटींचा गैरव्यवहार केला आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा