टोकियो : जपानचे नवे पंतप्रधान योशिहिदे सुगा असणार आहेत. ते शिंजो आबे यांची जागा घेतील. शिंजो आबे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव नुकताच राजीनामा दिला होता. त्यामुळे जपानची सूत्रे आता कोणाच्या हाती जाणार याबद्दल सर्वांना उत्सुकता होती. यामध्ये सुगा यांनी बाजी मारली आहे. सुगा यांची जपानच्या लिबरल डेमोक्रेटिक पक्षाच्या (एलडीपी) नेतेपदी निवड झाली आहे. लवकरच शपथविधी पार पडणार आहे. मुख्य कॅबिनेट सचिव असलेल्या सुगा यांना एलडीपीच्या नेतेपदाच्या निवडणुकीत 534 पैकी 377 मते मिळाली. जपानचे माजी संरक्षणमंत्री शिगेरु इशिबा आणि माजी परराष्ट्र मंत्री फुमियो किशिदा यांना अनुक्रमे 68 आणि 89 मते मिळाली. जपानच्या संसदेतील एलडीपीचे बहुमत पाहता उद्या (बुधवारी) संसदीय मते जिंकून सुगा पंतप्रधानपदी विराजमान होण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा