योगी सरकारचा धक्कादायक निर्णय

लखनऊ : योगी सरकारने उत्तर प्रदेश विशेष सुरक्षा विभाग (युपीएसएसएल) सुरू केला आहे. या विभागाचे अधिकार केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाप्रमाणेच असतील. त्यानुसार, युपीएसएसएल कोणाचीही विना वॉरंट चौकशी करू शकतो. तसेच त्याला अटकदेखील करू शकतो. आता याच विभागाकडे उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय, प्रशासकीय कार्यालय आणि परिसर, तीर्थक्षेत्र, मेट्रो, रेल्वे आणि हवाई स्थानक, बँक, शैक्षणिक संस्था, औद्योगिक संस्थांची सुरक्षा व्यवस्था असेल. उत्तर प्रदेश सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडलवर याची ट्विटद्वारे माहिती देण्यात आली. अतिरिक्त गृह सचिव (गृह) अवनीश अवस्थी यांनी सांगितले, की सुरुवातीला पाच पथके तयार केली जाणार आहेत. या अंतर्गत 1913 नव्या पदांची निर्मिती केली जाईल. त्यासाठी 1747 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये वेतन-भत्त्यासह अन्य बाबींचा समावेश असेल. महत्त्वाच्या स्थानांच्या सुरक्षेसाठी सध्या 9 हजार 919 कर्मचारी कार्यरत आहेत, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा