चेतन भगत यांची खंत

नवी दिल्ली : कोरोनाच्या आव्हानानंतर देश मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. मात्र, त्याचवेळी देशातील तरुण चित्रसृष्टीतील कोडी सोडवण्यात दंग असल्याची खंत प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी व्यक्त केली आहे.

नागरिकांनी सतत देशाच्या आर्थिक स्थितीकडे दुर्लक्ष केले तर देशाची अवस्था दयनीय होईल, असेही भगत म्हणाले. जनतेला अर्थव्यवस्थेची काळजी नाही. तरुण अर्थव्यवस्थेच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून चित्रसृष्टीतील कोडी सोडवण्यात दंग आहेत. कोणतेही सरकार सत्तेत असले जनतेला अर्थव्यवस्थेची फिकीर नसते, हे राजकीय नेते ओळखून आहेत. त्यामुळे ते अर्थव्यवस्थेतील संकटे दूर करण्यासाठी वेळ घालवत नाहीत. लोकांनाच अर्थव्यवस्थेची काळजी नसेल तर राजकीय लोक त्यासाठी काळजी का करतील, असा प्रश्न भगत यांनी केला आहे.

पुढील वर्षी पदव्या घेऊन बाहेर पडणार्‍या किती तरुणांना रोजगार मिळेल हा प्रश्नच आहे. त्यांना चित्रसृष्टीतील कोडी सोडवत बसावे लागेल किंवा नोकरी मिळवण्याचा विचार करावा लागेल, असेही भगत म्हणाले. लॉकडाउन भारताला परवडणारे नसून त्यामुळे आर्थिक परिस्थिती आणखी बिघडणार असल्याचेही ते म्हणाले.

मोबाईल पाहणे थांबवावे

देश संकटात असताना तरुणांनी मोबाईल फोनकडे पाहणे थांबवून अर्थव्यवस्थेबद्दल बोलायला हवे. सध्या भारतीय तरुण सभोवताली घडणार्‍या घटनांकडे दुर्लक्ष करत आहेत, असेही भगत म्हणाले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा