नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर कायम आहे. मागच्या 24 तासात कोरोनाचे 92 हजार 71 रुग्ण समोर आले; तर 1 हजार 136 जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्या 48 लाख 46 हजार 428 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 79 हजार 512 वर मृत्यू झाले आहेत. गेल्या 24 तासांत 77 हजार 512 रुग्ण बरे होऊन घरी परतले; तर 37 लाख 80 हजार 108 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 77.99 टक्क्यांवर पोहोचले आहे. देशात सध्या 9 लाख 86 हजार 598 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागच्या काही दिवसांत मृत्युदर कमी झाला आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात 2.15 टक्के इतका मृत्युदर होता. आता तो 1.72 टक्क्यांवर आला आहे; पण मागच्या आठवड्यातभरात देशात दररोज किमान 1 हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत होता. गेल्या 24 तासात 10 लाखांवर कोरोना चाचणी घेण्यात आली. आतापर्यंत 5 कोटी 72 लाखांहून अधिक जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. देशात सर्वाधिक 28 टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहेत. कर्नाटकात 11 टक्के, आंध्र प्रदेशात 10, उत्तर प्रदेशात 7, तामिळनाडू 5, ओडिशात तर तेलंगणा, आसाम आणि छत्तीसगडमध्ये प्रत्येकी 3 टक्के रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. उर्वरित 26 टक्के रुग्ण इतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत. सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल, बिहार, तेलंगणा, आणि गुजरातमध्ये होत आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा