नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी लॉकडाऊन करण्यात आला. हजारो मजुरांनी पायीच घराकडे वाटचाल सुरू केली. यात अनेकांना प्राण गमवावे लागले. मात्र, लॉकडाऊनच्या काळात किती जणांना जीव गमवावा लागला, याची सरकारकडे कोणतीच माहिती नाही. हे धक्कादायक वास्तव सोमवारी समोर आले. लॉकडाऊनच्या काळात किती जणांना जीव गमवावा लागला? किती जणांचा रोजगार हिरावला गेला? याची सरकारला विचारणा करण्यात आली होती.

लोकसभेत विरोधी पक्षाच्या प्रश्नांची उत्तरे मंत्री संतोष कुमार गंगवार यांनी लिखित स्वरूपात दिली. भारतात केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन यांनी एक देश म्हणून कोरोनाविरुद्ध युद्ध लढले, असे त्यांनी आपल्या उत्तरात म्हटले. मात्र, गरीब प्रवासी मजुरांच्या मृत्यूच्या आकड्याबद्दल आपल्याकडे माहिती उपलब्ध नसल्याचेे त्यांनी सांगितले. रेशनिंगच्या मुद्द्यावरही मंत्रालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले. राज्यवार आकडा न उपलब्ध होऊ शकल्याचे यात सरकारकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा