नवी दिल्ली : रस्टार स्पोर्ट्सने प्रतिष्ठित टी-20 लीग आयपीएलच्या नव्या हंगामासाठी समालोचकांची यादी जाहीर केली आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावसकर, प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले, आकाश चोप्रा आणि इयान बिशप यांच्यासह अनेक दिग्गजांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. मात्र, या यादीतून माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांना वगळण्यात आले आहे.

स्टार स्पोर्ट्सने हिंदी आणि अन्य भाषांमध्ये समालोचकांसाठी स्वतंत्र नावे जाहीर केली आहेत. इंग्रजीसाठी जाहीर केलेल्या समालोचकांच्या यादीत मार्क निकोलस यांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेच्या स्थानिक सामन्यांमध्ये निकोलस समालोचन करतात. आयपीएलच्या काही संघांकडून खेळणारा आणि दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व केलेला जेपी डुमिनीही या पॅनेलचा भाग असेल.

72 वर्षीय गावस्कर हे समालोचनासाठी यूएईला जातील. तर ब्रेट ली, डीन जोन्स, ब्रायन लारा, ग्रॅमी स्वान आणि स्कॉट स्टायरिस हे मुंबईहून समालोचन करताना दिसणार आहेत. त्याचबरोबर माजी भारतीय क्रिकेटपटू आशिष नेहरा आणि इरफान पठाण हिंदी भाषेतून समालोचन करणार आहेत. समालोचकांच्या यादीमध्ये लिसा स्थळेकर आणि माजी भारतीय कर्णधार अंजुम चोप्रा या महिलांचाही समावेश आहे. आयसीसी हॉल ऑफ फेम मिळालेल्या लिसा यांनी यापूर्वी आयपीएल समालोचन केले आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य निवडकर्ता के. श्रीकांत तामिळ तर, एमएसके प्रसाद तेलुगू भाषेत समालोचन करतील. भारतीय संघाचे माजी सहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर हे हिंदी समालोचकांच्या गटात सहभागी होतील.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा