पुणे : लॉकडाऊनमुळे अर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील प्रवासी व मालवाहू वाहनधारकांना वार्षिंक करात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मालवाहू, प्रवासी, शालेय वाहतूक करणार्‍या वाहनांना याचा फायदा होणार आहे. या निर्णयामुळे वाहन मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन पुकारण्यात आल्याने मार्चअखेरपासून देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला. या काळात प्रवासी वाहतूक पुर्णतः बंद होती. तर, केवळ अत्यावश्यक कारणासाठी मालवाहतूक सुरु होती. व्यवसाय ठप्प झाल्याने वाहनधारकांना मोठा तोटा सहन करावा लागला. यामुळे परिवहन विभागाने वाहनधारकांना वाहन करात सुट द्यावी, अशी मागणी वाहन संघटनांनी केली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने वाहतूकदारांना दिलासा दिला आहे. 50 टक्के वार्षिक कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या वाहन मालकाने मागील वर्षाचा वार्षिक कर 31 मार्च पुर्वी भरणा केला असेल, अशाच वाहनधारकांना 50 टक्के करमाफीचा लाभ घेता येणार आहे, ्असे आदेशात म्हटले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा