नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेले ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी या निर्णयावर फेरविचार अर्ज दाखल केला आहे. भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयाला 14 ऑगस्टला सुनावलेल्या निर्णयावर फेरविचार करण्यास सांगण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयावर ट्विट केल्यानंतर न्यायालयाने त्यांना अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. फेरविचार याचिकेवर खुल्या न्यायालयात सुनावणी घेण्याची मागणीही भूषण यांनी केली आहे.

न्यायाधीश अरुण मिश्रा यांनी अवमान प्रकरणांमध्ये सुनावणी घेण्याचा अधिकारच नाही. त्यांनी याआधी अनेक जनहित याचिका फेटाळून लावल्या आहेत. त्यात राजकीय नेत्यांना देणग्या देण्याचे कथित प्रकरणही समाविष्ट आहे. अर्जदारांना न्यायाधीश मिश्रा यांच्याकडून न्याय मिळणार नाही याची खात्री होती. त्याच मिश्रांनी भूषण यांना न्यायालयाच्या अवमानप्रकरणी दोषी ठरवणार्‍या खंडपीठाचे नेतृत्व केले होते, असेही भूषण यांनी अर्जात म्हटले आहे.

भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात रिट अर्ज दाखल करून शिक्षेविरोधात न्याय मागण्याचा प्रत्येकाला मूलभूत अधिकार असल्याचे सांगितले. तसेच, वेगळ्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्याची त्यांनी मागणी केली. वकील कामिनी जयस्वाल यांनी हा अर्ज सादर केला. चुकीच्या शिक्षेविरोधात न्याय मागण्याबरोबरच प्रत्येकाला आपल्या अधिकाराबाबत अवगत करण्यास यामुळे मदत मिळणार असल्याचे अर्जात म्हटले आहे. तीन ऑगस्टला भूषण यांना दोषी ठरवून एक रुपयाचा दंड सुनावण्यात आला होता.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा