सातारा, (प्रतिनिधी) : पोलिसांसाठी व जिल्ह्यावासियांसाठी लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही सर्व प्रयत्न करत असून नागरिकांनी घाबरुन जावू नये, सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस व खासगी लोकांसाठी सुरु केलेले ऑक्सिजनयुक्त कोविड हॉस्पिटल राज्यात आदर्शवत आहे, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.

पोलीस दलासाठी उभारण्यात आलेल्या पहिल्याच कोविड केंद्राचा लोकार्पण सोहळा रविवारी सायंकाळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जयकुमार गोरे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.

या हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर, हाय फ्लो ऑक्सिजन, ऑक्सिजन बेड, साधारण बेड, एक्स-रे मशिन, ईसीजी मशिन, कार्डीयाक अ‍ॅम्ब्युलन्स (24 तास उपलब्ध) इत्यादी सुविधा असणार आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा