पुणे : महापालिकेच्या लायगुडे, खेडेकर, दळवी रूग्णालयात येत्या दहा दिवसांत शंभरहून अधिक ऑक्सिजन बेड उभारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी संबंधित रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा उभारण्याची कार्यवाही सुरू झाली आहे़

महापालिकेच्या सर्व रुग्णालयांतील प्रमुखांची तसेच आरोग्य विभागातील अधिकार्‍यांची सोमवारी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. यामध्ये रुग्णालयातील समस्या सोडविण्याबरोबरच बेड क्षमता वाढविण्यासाठी भर दिला गेला़ यानुसार, महापालिकेच्या माध्यमातून येत्या दहा ते पंधरा दिवसांत धायरी येथील लायगुडे रुग्णालयात 30, बोपोडी येथील खेडेकर रुग्णालयात 40 ऑक्सिजन बेड नव्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे़ तसेच, शिवाजीनगर येथील दळवी रुग्णालयात येत्या दोन दिवसात 50 ऑक्सिजन बेड कार्यरत होणार असून, सद्यस्थितीला येथे 30 ऑक्सिजन बेड व 10 व्हेंटिलेटर बेडवर रुग्ण उपचार घेत आहेत़

बाणेर येथील कोरोना रुग्णालयाचे काम डॉ. भिसे यांच्याकडे देण्यात आले असून, येथेही टप्प्याटप्प्यानेच वैद्यकीय सेवांची क्षमता लक्षात घेऊन बेडची संख्या वाढविण्यात येत आहे़ रविवारी येथे 10 ऑक्सिजन बेड नव्याने सुरू करण्यात आले. येत्या दोन दिवसांत आणखी 35 ऑक्सिजन बेडची क्षमता वाढविण्यात येणार आहे़ त्यामुळे 314ची क्षमता असलेले हे रुग्णालय 100 बेडच्या क्षमतेने सुरू राहील असेही अग्रवाल यांनी सांगितले़

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा