नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला. ते सध्या गृह विलगीकरणात आहेत. स्वतः सिसोदिया यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली. मला किंचितसा ताप आला होता. त्यामुळे कोरोना चाचणी केली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्या कोणताही त्रास नाही. मी पूर्णपणे ठीक आहे. लवकरच तुमच्या सेवेत हजर होईन, असे ट्विट सिसोदिया यांनी केले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा