मुंबई, (प्रतिनिधी) : राज्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला असून कोरोनाबधितांच्या संख्येत सोमवारी महाराष्ट्राने रशियालाही मागे टाकले. गेल्या 24 तासांत राज्यात नवीन रुग्णांची नोंद झाल्याने कोरोनाबधितांची संख्या 10 लाख 77 हजार 374 झाली आहे. रशियातील कोरोनाबधितांची एकूण संख्या 10 लाख 68 हजार 320 आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे 29 हजार 894 जणांचा मृत्यू झाला. तर रशियात 18 हजार 635 मृत्यू झाले आहेत. अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी देशात व राज्यात ’अनलॉकिंग’ची प्रक्रिया सुरू आहे. जसजसे निर्बंध शिथिल केले जात आहेत, तसतसा कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा