विद्यापीठाच्या अहवालातील माहिती

नवी दिल्ली : कोरोना रुग्णसंख्येत भारताने ब्राझीलला मागे टाकून जगात दुसर्‍या क्रमांकावर झेप घेतली आहे. मात्र, कोरोनामुक्त होणार्‍यांमध्ये भारत जगात प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती जॉन हापकिन्स विद्यापीठाने एका अहवालाद्वारे दिली आहे.

आतापर्यंत जगभरातील एक कोटी 96 लाख 25 हजार 959 जणांनी कोरोनावर मात केल्याचे या अहवालात म्हटले आहे. त्याचप्रमाणे जगभरात कोरोनाबाधितांची संख्या तीन कोटीच्या आसपास पोहोचली आहे. तर जगभरातील नऊ लाख 24 हजार 105 जणांचा मृत्यू झाला आहे.

जॉन हापकिन्स विद्यापीठाने जगभरातील आकडेवारी एकत्र करून त्याचा अहवाल तयार केला आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनामुक्त होणारांचे प्रमाणही अधिक असल्याचे नुकतेच केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले होते. 24 तासांत 77 हजार 512 जणांना रुग्णालयातून सोडण्यात आल्याचेही केंद्रीय आरोग्यमंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा