नवी दिल्ली : कांद्यावर निर्यातबंदीचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. गेल्या काही महिन्यांमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणावर निर्यात झाली. यातून देशातील बाजारपेठांमध्ये कांद्याच्या दरांत मोठी वाढ झाल्याने ती थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय तातडीने लागू करण्यात आला आहे. बंगळुरु आणि कृष्णापुरम येथील कांद्यावरही निर्यातबंदी लागू करण्यात आली आहे. आत्तापर्यंत या कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली नव्हती. मात्र आता या कांद्याच्या बाबतीतही सरकारने निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे.

भारताने एप्रिल ते जून या कालावधीत 19.8 कोटी डॉलर किंमतीचा कांदा निर्यात केला. भारतातून बांगलादेश, मलेशिया, युएई आणि श्रीलंका या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांदा निर्यात होतो.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा