पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी कोरोनाचे हजार 821 नवे रूग्ण आढळले. तर 23 जणांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी 459 जणांना घरी सोडण्यात आले आहे.

शहरात 64 हजार 382 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 9 हजार 606 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात सोमवारअखेर 50 हजार 438 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आत्तापर्यंत 1353 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मनपा हद्दीतील 1056 तर 297 मनपा हद्दीबाहेरील आहेत. सोमवारी 2 हजार 857 संशयित रूग्णांना महापालिकेच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. 3 हजार 503 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले. 2010 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. शहरातील 10 हजार 34 घरांना भेटी देऊन 32 हजार 85 जणांचे सर्व्हेक्षण करण्यात आले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा