मुंबई : वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदवी प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय प्रवेश परीक्षा (नीट) रविवारी देशभरातील 3 हजार 842 परीक्षा केंद्रावर पार पडली. अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र गाठण्यासाठी 300 ते 400 किमीचा प्रवास करावा लागला. नंदुरबारमधून मुंबईत परीक्षेसाठी आलेल्या एका विद्यार्थिनीला तब्बल 400 किमीचा प्रवास करावा लागला.

नंदुरबार ते मुंबई असा खासगी वाहनाने प्रवास करण्यासाठी या विद्यार्थिनीला 15 हजार रुपये मोजावे लागले. एंजल गावित असे या 17 वर्षीय विद्यार्थिनीचे नाव आहे.

एंजल परीक्षेसाठी बहीण आणि मैत्रिणीसोबत शनिवारी रात्री 9 वाजता नंदूरबारमधील नवापूर येथून निघाली. सात तासांचा प्रवास करून रविवारी पहाटे चार वाजता ती ठाण्यातील एका नातेवाइकाकडे पोहोचली. थोडावेळ आराम केल्यानंतर ती ठाण्याहून बोरिवली बसने आणि बोरिवलीहून कांदिवलीसाठी रिक्षा करून परीक्षा केंद्रावर पोहोचली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा