पुणे : शहरामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. काही समाजमाध्यमांमधून पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याचे संदेश फिरत आहेत. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. शहरात आता लॉकडाऊन करण्यात येणार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महापालिका प्रशासनातर्फे कंटेन्मेंट झोनमध्ये पत्रे लावण्यात येत आहेत. त्यामुळे पुन्हा लॉकडाउन होणार, निम्मे पुणे बंद होणार अशा अफवा समाज माध्यमांमधून फिरत आहेत. शहरामध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यासंदर्भात शासनाने कोणतेही आदेश काढलेले नाहीत. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क वापराची सक्ती करण्यात आली आहे. सुरक्षित अंतर राखणे, सॅनिटायझरचा वापर, आवश्यक असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

शहरामध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मास्क लावणार्‍यांवर पोलिस प्रशासनाकडून कारवाई सुरु करण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाने सुध्दा जम्बोमधील खाटांची संख्या वाढवण्यास सुरुवात केली आहे. शहरात लॉकडाऊन करण्यात येणार नसल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा